Friday, December 21, 2012

आकाश कंदिलाची प्रतिकृती

छोट्या दोस्तांच्या आठवणीत छोट्यांसाठी ही एक छोटी कलाकृती:

साहित्य: जाडसर पुठ्ठा, ग्लु स्टिक, ८-१० सें.मी. लांबीचा सोनेरी गोठ, २-३ रांगांच्या ग्लिटर ग्लु ट्यूब्ज, ३-४ झिरमाळ्या

कृती: पुठ्ठा साधारण तळहाता एवढ्या चांदणीच्या आकारात कापून घ्यावा. मी मायकेल्समध्ये मिळणारी ३-डी चांदणी वापरली आहे. चांदणीच्या एका बाजूस सोनेरी गोठ चांदणी अडकवता येईल असा चिकटवून घ्यावा. त्यावर एक छोटा कागदाचा कपटा चिकटवून द्यावा म्हणजे गोठ पक्का बसेल, हालणार नाही. गोठ लावलाय त्याच्या विरुद्ध बाजूस खाली झिरमाळ्या अशाच पद्धतीने चिकटवा. आता दुसर्‍या बाजूस ग्लिटर ग्लु ट्यूब्ज वापरून नक्षी बनवा. आकाश कंदिलाची प्रतिकृती तयार आहे.

तयार झालेला कंदील:

* सँडि हूक मधील बाळांना समर्पित. जिथे असाल तिथे सुखात राहा. RIP! 
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी