जिंजरब्रेडपासून बनवलेले घर म्हणजे जिंजरब्रेड हाउस. फोटो प्रकाशित करायला घेतले तेव्हा जिंजरब्रेडविषयी थोडी शोधाशोध केली. आले, मध आणि काकवी घालून जो पदार्थ बनतो त्याला जिंजरब्रेड म्हणत असत असे समजले. आता ब्रेड, कुकी, केक सगळ्याच पदार्थांना सरसगट 'जिंजरब्रेड' म्हणतात. त्यातला जरा खुसखुशीत बिस्किटाचा प्रकार जिंजरब्रेड हाउस बनवण्यासाठी वापरताना बघितले आहे. कधी काळी कुणा सुगरण "शेफ"ने कुकीज बिघडवल्या असतील. हॅलोवीन नुकताच होवून गेला असल्याने पोराबाळांनी तंगडतोड करून मागून मागून आणलेल्या कँडीज संपवायच्या कशा हा प्रश्न पडला असेल. क्रिसमस कुकीजसाठी केलेले आयसिंग आयतेच हाती लागले असेल. मग काय घ्या चुकलेल्या जिंजर कुकीज, फासा त्यावर आयसिंग आणि करा सजावट. त्यानिमित्ताने पोरे एका जागी बसतील थोड्या वेळासाठी अशा विचारांत जिंजरब्रेड हाउसचा जन्म झाला असावा असा माझ्या म.म. मनाचा एक अंदाज. पण तसे काही नाही. त्यामागची खरी परंपरा इथे वाचता येईल.
किट आणून जिंजरब्रेड हाउस बनवणे खूप सोपे आहे. हॅलोवीन संपला की लगेचच "जिंजरब्रेड हाउस किट" सगळ्या दुकानांमध्ये दिसायला लागतात. एका छोट्या किटमध्ये जिंजरब्रेडपासून बनवलेल्या सुट्या भिंती आणि छत, आयसिंगसाठी पिठी आणि शंकूच्या आकारातली छोटी पिशवी, सजावटीसाठी चार-पाच प्रकारच्या अत्यंत आकर्षक रंगातल्या कँडीज (*) असतात. आयसिंग बनवण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी त्यांनी दिलेल्या सगळ्या सूचना तंतोतंत पाळायच्या. सजावटीचे १-२ प्रकार किटवर दिलेले असतात. त्यातला कुठला करायचा आहे हे नक्की करायचे. आयसिंगसाठी दिलेल्या कोनाला आधी छोटेच छिद्र करून घ्यायचे. मोठे झाले तर खूप जास्त आयसिंग बाहेर येते आणि त्यावर गोळ्या नीट बसत नाहीत. शिवाय पूर्ण वाळायच्या आतच आयसिंग ओघळायला लागते. आयसिंगच्या रेघा एकसारख्या उमटल्या तर सुंदर एकसारखी नक्षी तयार होते. याचे तंत्र थोडेसे मेंदीसारखे आहे पण कमी क्लिष्ट. एकदा लेकाने हट्ट केला म्हणून किट आणले होते. ही सजावट करायला इतकी मजा येते की आता दरवर्षी आणतो. आम्ही तशी फार साधी, मराठीत ज्याला "बेसिक" म्हणतात अशी सजावट करतो. गूगलवर शोधले तर डोळ्यांचे पारणे फिटेल अशी घरे बघायला मिळतात.
ही आम्ही गेल्यावर्षी बनवलेल्या जिंजरब्रेड हाउसची काही प्रकाशचित्र:
* हे सगळे प्रकार एरवी खाद्यपदार्थ असले तरी अनेकदा 'जिंजरब्रेड हाउस किट'मधले पदार्थ खाण्यायोग्य नाहीत अशी सूचना पाकिटावर लिहिलेली असते.
इथे अनेक कंपन्यांमध्ये वर्षातून १-२ वेळा "Bring your kid to work" असा राखीव दिवस असतो. त्या दिवशी ऑफिसमध्ये वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी खेळ आणि इतर कार्यक्रम ठेवतात. हॉलिडे सीझन असेल तर जिंजरब्रेड हाउस डेकोरेशन हा हमखास यशस्वी आणि लोकप्रिय कार्यक्रम असतोच. And it's not just for kids. Gingerbread house decoration is a serious business for adults too. ऑफिसतर्फे डझनभर वेगवेगळ्या आकारातली घरे, अमर्याद आयसिंग आणि घमेली भरभरून रंगीबेरंगी गोळ्या पुरवतात. लोकं आपापल्या घरून पण बरेच सामान घेऊन येतात. छोटे प्लॅस्टिकचे क्रिसमस ट्री, घरासमोरच्या अंगणात ठेवायला रेनडियर, सँटा, दाराबाहेर ठेवायला पिटुकले गिफ्ट बॉक्सेस, कँडि केन किंवा ट्विझलर्स कापायला टूल्स असे बरेच सामान असते. सजावटीचे नमुने छापून आणतात आणि १-२ तास अक्षरशः मानपाठ एक करून त्या नमुन्याबरहुकूम जिंजरब्रेडची देखणी घरे बनवतात. या सगळ्या तयार झालेल्या घरांचे प्रदर्शन एका बाजूला मांडले जाते. माझ्या आधीच्या क्लायंटकडे स्पर्धा आणि चॅरिटीसाठी लिलाव व्हायचा. चॅरिटीसाठी जी संस्था निवडली असेल त्यांच्याच कर्मचार्यांतर्फे पहिले तीन विजेते निवडले जायचे. पहिल्या तीन की बहुतेक सगळ्याच घरांना किंमत लिहिण्यासाठी रिकामे टॅग लावले जायचे आणि मग लिलाव व्हायचा. घरांच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम त्या संस्थेला दिली जायची. एकुणात ऑफिसमध्ये सगळ्या वर्षभरातला हा एक अतिशय "रिलॅक्सिंग" दिवस असतो.