२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' मायबोलीवर गेल्या वर्षीपासून साजरा होतोय. अतिशय स्तुत्य अशा ह्या उपक्रमास पहिल्याच वर्षी भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी पत्रलेखन ह्या जवळ जवळ लयास गेलेल्या कलेची नव्याने उजळणी केली तर काहींनी ठेवणीतली म्हणावी अशी पत्रे मोकळेपणाने प्रकाशित केली. बालगोपाळांची बडबड गीते विषेश उल्लेखनीय म्हणावी अशी.
ह्या वर्षी सुद्धा अनेक स्पर्धा घेण्यात येत आहेत. 'केल्याने भाषांतर' मध्ये विविध भाषांमधल्या कलाकृती मराठीत वाचायला मिळतील तर 'ये हृदयीचे ते हृदयी' मध्ये आपल्या आवडत्या, भावलेल्या कवितांची रसग्रहणे वाचायला मिळतील. बाळगोपाळांची बडबडगीते आहेतच पण 'बालकवी' मध्ये आपल्याला त्यांच्या स्वतःच्या साहित्यकृती त्यांच्या भाषेत वाचायला मिळतील. अधिक माहिती आणि सर्व प्रवेशिका इथे बघता येतील.