Tuesday, December 25, 2012

Young entrepreneur Ritesh Ambastha


He was a graduate student when I first met him. His father had just got a job transfer from Delhi to Gujarat.  He started his first year of Engineering at Saurashtra University with great aspirations but the picture was not very bright. The curriculum was not up to date, computer labs were poorly equipped, the library did not have sufficient resources and no on-campus recruitment was offered. Search engines like Google and Yahoo were ready to help still accessing new technology was difficult because of several reasons, such as low bandwidth. His days were fun-filled, but nightmares about the future wouldn’t let him sleep peacefully. He started looking for options. While sharing knowledge and information with friends, the idea of organizing a technology workshop first occurred to him. The journey, which began with a small, friendly event, has now taken the form of a successful startup company, iWillStudy.

It is with great honor and pride that I introduce this young entrepreneur. Please meet founder and CEO of iWillStudy.com, Mr. Ritesh Ambastha.
First, hearty congratulations on the successful launch of the Android app for Gujarat Technological University, which I believe has crossed 3000 Downloads!
Thank you for valuing my efforts to improve the higher education system in India. This app will be a one-step solution for students to view news, bulletins, results, calendars, question papers, syllabi, study-materials, etc. on their mobile phones.

Please tell us about yourself.
I am an experienced software professional in Mobile, Web Development, Search Engine Development and Location Based Services application domains. After completing my degree in Computer Engineering, I joined Powai Labs Pvt. Ltd., which was a start-up company supported by IIT-Mumbai. As soon as I finished my training from Powai, I was selected as a Research Assistant in IIT where I worked on J2ME based mobile applications. After that, I joined another IIT Mumbai initiated start-up company, Mobiance Technologies. There, I worked on various Mobile and Web based mapping and mobile tracking applications.  Then, I joined Reliance BIG Entertainment where I worked for a couple of years. Now I am founder and CEO of a company that works in the education domain – iWillStudy.com.
What is iWillStudy.com?
iWillStudy.com is a virtual platform for graduates from engineering and other streams.  iWillStudy.com allows the user to view the latest tools and technologies and current trends in the field of technology, and helps them come up to speed with the job market demands.
iWS is currently working in three domains-  iWS Events, iWillStudy.com and iWS-Training & Placements

As a part of iWS Events, we organize knowledge- intensive technical seminars and workshops in colleges. We invite industry experts from companies like Red Hat, Reliance, Nokia, IIT Mumbai, and eInfochips to provide guidance.
iWillStudy is a social portal, which works as a virtual platform for helping students learn new technologies in a collaborative, community- driven way. It is a social network website specially designed for students.  They can start groups, discussion forums, ask questions and share knowledge by making contributions to various channels. They can also build an online resume. This provides an instant visibility to their profile and provides them with an opportunity to connect with recruiters. Highly skilled professionals also contribute to our forums. Today, there are more than 1650 registered students on this portal.
Through the iWS-Training & Placement segment, we provide training in the latest tools and technologies. This segment innovates and delivers multiple educational products to the market.

How did the idea of iWillStudy occur to you?
I used to help my fellow students in my college days. I used to conduct seminars and workshops for them. It was a part of my routine to help my friends and junior graduate students. I was the founder of a technical group in the college,‘Emerging Techies,’ and led it for almost two years. ‘Emerging Techies’ organized several seminars and workshops.
In those days, I realized the fervor with which students explored and learned new technologies. Unfortunately, the latest tools and technologies were not part of our curriculum.

Gradually, I got more involved in those activities; it gave me more satisfaction than anything else. I found my interest and decided to pursue this interest– to help students – for all my life. So the story of iWillStudy.com started.


Who are your target clients?

The target group mainly comprises of engineering and business school graduate students from metropolitan areas. Colleges are our customers, as we organize technical or management events for them. The third set of clients includes students, for whom we arrange internships and jobs with companies.
How was the initial response to iWillStudy? Has it changed significantly?
We received mixed responses from a mixed set of the population– some appreciated us, some criticized us, and others didn’t care. People who were very close to me and knew me well, also did not believe in me when I started, but we are slowly building confidence in them.

iWillStudy has grown up in different ways in the past two and a half years. It has been a long journey, and what we have to offer has evolved in multiple ways. The first event that we organized was in Rajkot (Gujarat).  310 students registered and participated. This was one of our most successful events to date.
We are growing exponentially as a business model. Event management in the education sector does not pay very well, and one must have a solid strategy in place to follow the planned revenue model. I started by myself,but now we are a team consisting of 8 full-time employees, several partners, and a multitude of consultants. As far as creating values for  society is concerned, nothing can beat our model of helping students.

You graduated from C.U. Shah College of Engineering & Technology. Is that the reason you chose Gujarat for starting new business?
Yes. Since I spent four years of college in Gujarat, I knew people there. My classmates and friends helped me reach out to my clients in the early days. But the main reason for choosing Gujarat was that there are more than 200 colleges in my target group and the quality of the education system is not very good. I knew there was an opportunity to improve. Also, Ahmadabad is not as costly as Mumbai to start a new business. Cost was definitely one of the most important factors in choosing Ahmadabad.
iWillStudy.com was featured in newspapers (*) and tech talks. Was this a part of your advertising efforts/campaign or a result of your popularity?
There were no advertising efforts. This is the result of our good work. Social networking and word-of-mouth publicity has helped us a lot. We think that 2+ years of hard work has helped us gain faith and trust from our target clients.

Did you face any advantages or disadvantages of your young age?
Every coin has two sides :) 

It was very challenging to convince professors and college/university management that my solutions were worthy of merit because they were much older than me. There were times when people didn’t take me seriously because of my young age. On the other hand, it was very easy to gel with our customers – students. Being their mentor as well as a friend (on Facebook) helped me to some extent.
You mentioned Facebook. Did you make use of social media? How?   
Social media played a crucial role in promoting our events, brand and offerings. As we are into the B2C (business to consumer) segment, we gel with our customers on Facebook and other social platforms like Twitter. There are more than 1691 fans of our Facebook page http://www.facebook.com/iwillstudy. This page helps us in keeping our customers updated, involved, and only a click away from us.

Using Facebook has helped us in several ways. More than 36% of traffic on our website comes from Facebook. This is a direct impact of our promotional strategies on Facebook. Also, post event photographs, technology updates, news and stories are a part of our social activities.

Several of us, at some point in our professional career, come up with business ideas and dream of starting a company. But very few of us pursue our dreams. When and how did you arrive at the decision of taking a step towards your dream? Please tell us about that decisive moment.
After working for 4 years after completing graduation, I realized that the right time had come. I was not enjoying my work, especially the ‘9 to 5’ routine. I realized that there was something more that I wanted to do; to serve and help people, and to help the society by creating values and solving fundamental problems.
The final moment came when we were wrapping up a project at Reliance BIG Entertainment. I was involved in building India’s largest local search portal. By the time the project went live, I realized that my job was over. I thought that it was the right time to move on, and decided to pursue my interest.

How difficult it was for you to quit your job and let go the fat check, security, and the routine life that came with it?
It was indeed a difficult decision. But I had made up my mind to pursue this dream. A fat check or a routine life never appealed to me enough to provide a reason for my existence.
My dream of starting something new and helping people led me to making this decision. There was no looking back, and I was sure that I would make more than just those pay checks.

How did your parents react to your decision?
Well, they were a bit surprised at first,but very supportive. They believed in me and kept me motivated. 

You worked with a start-up company in the beginning phase of your career. Did that help in making a decision then or in running the company now?
Working with start-ups in the early phase of my career helped me a lot. Their successes, as well as their failures, were good learning experiences. I learnt basics of running a business and leading the projects from the very front. I picked up so many positives from this journey. 

What next after iWillStudy.com? Do you have plans for expansion in or outside of Gujarat?
We are working on our expansion model. We are planning to set up branches of iWillStudy.com in Pune, Indore, Jaipur, Lucknow, Bhopal, and Cochin in the coming years. We have also been talking with a few investors who will help us with our goals.
You have had quite an exciting career as a young entrepreneur. Would you like to share an interesting experience/incident from your journey so far?
There are tons of stories. Getting up in the morning and seeing my photograph in the leading newspapers of Ahmedabad and in the Times of India is one of the most interesting and amazing experiences so far.
What advice would you give to upcoming young entrepreneurs?
The hardest thing about a start up is to make a start.  Then, the most important objective is to keep it alive. 2-3 years ago, I was alone and had a vision. I was making good money for my professional experience and age. But, I had more reason to exist in this world; to create values for the society. That was the only thought that forced me to quit my job and take this risk- a risk to help people. I was on my way to create values, and in turn, create intellectual capital.
The second principle is to create people! A company is all about people and you have to take risk in believing in people.
You don't need a big plan when you begin. Keep visiting cards, an information brochure, and a business suit ready-to-wear, and jump into it! 

* iWillStudy was featured in-
http://www.ahmedabadmirror.com/index.aspx?page=article&sectid=3&contentid=2012051520120515025154456e2278519

http://www.crunchbase.com/person/ritesh-ambastha-2

http://yourstory.in/2012/06/students-to-professiona-with-iwillstudy-com/



Special thanks to Sakhipriya and Mrunmayee. This interview wouldn't have completed without their valuable inputs.


Friday, December 21, 2012

आकाश कंदिलाची प्रतिकृती

छोट्या दोस्तांच्या आठवणीत छोट्यांसाठी ही एक छोटी कलाकृती:

साहित्य: जाडसर पुठ्ठा, ग्लु स्टिक, ८-१० सें.मी. लांबीचा सोनेरी गोठ, २-३ रांगांच्या ग्लिटर ग्लु ट्यूब्ज, ३-४ झिरमाळ्या

कृती: पुठ्ठा साधारण तळहाता एवढ्या चांदणीच्या आकारात कापून घ्यावा. मी मायकेल्समध्ये मिळणारी ३-डी चांदणी वापरली आहे. चांदणीच्या एका बाजूस सोनेरी गोठ चांदणी अडकवता येईल असा चिकटवून घ्यावा. त्यावर एक छोटा कागदाचा कपटा चिकटवून द्यावा म्हणजे गोठ पक्का बसेल, हालणार नाही. गोठ लावलाय त्याच्या विरुद्ध बाजूस खाली झिरमाळ्या अशाच पद्धतीने चिकटवा. आता दुसर्‍या बाजूस ग्लिटर ग्लु ट्यूब्ज वापरून नक्षी बनवा. आकाश कंदिलाची प्रतिकृती तयार आहे.

तयार झालेला कंदील:

















* सँडि हूक मधील बाळांना समर्पित. जिथे असाल तिथे सुखात राहा. RIP! 

Sunday, April 22, 2012

दोन नमुने

कडकडून भूक लागली होती. घरून डबा आणला होता. गरम करायला पँट्रीत गेले. दोन्ही मायक्रोवेव्ह मध्ये अन्न गरम होत होतं. मला थांबणं भाग  होतं. काही काही लोकं ७-८ मिन. अन्न गरम करत ठेवतात. फ्रोझन मील असेल तर ठेवावंच लागतं. मला फार गरम अन्न आवडत नाही.  पण अगदी गार सुद्धा घशाखाली उतरत नाही. पण त्या  १ मिनिटासाठी नेहमी ताटकळत  उभं राहावं लागतं. कुणी ओळखीचं किंवा  टीममधलं भेटलं की वेळ बरा जातो. नाही तर  तिथल्या लोकांच्या कानावर आदळणार्‍या गप्पा आपण त्यातले नाहीच असं दाखवत ऐकत उभं राहा.  हा  त्या दिवशी कानावर आदळलेला  संवाद-
'मस्त वास येतोय.  काय आहे ?'
'बिर्याणी ! तुला आवडते का ?'
'हो तर, हा काय प्रश्न झाला ?  मी आणि माझी मुलगी  नेहमी जातो  इंडियन रेस्टॉरंटमध्ये'
'अरे वा ! कुठल्या ?'
'गावात आहे ते, दक्षिण ?'
'हो, त्याचं नाव आता कोरोमंडल झालंय'
'हो का ? तू कुठून आणलीस बिर्याणी ?'
'आणली नाही, ही घरी केलेली आहे'
'घरी ? बायको सुगरण दिसतेय तुझी'
'बायको सुगरण आहेच पण  ही बिर्याणी मुलीने केली आहे'
'मुलीने ? पण तू तर म्हणत होतास ती शाळेत जाते'
'हो, हाय स्कूलला जाते. सध्या बायको इथे नाही म्हणून स्वयंपाकाची जबाबदारी तिच्यावर आहे. मला तर  बुवा साधा भात सुद्धा करता येत नाही. स्वयंपाकघरात गॅससमोर उभं राहून काही करायचं म्हणजे जीवावर येतं अगदी.  बायकोने मुलीला सगळं शिकवलं आहे. त्यामुळे  ती नसली  तरी आमचे हाल होत नाहीत. तसं पण मुलीला  पुढे जाऊन  स्वयंपाक-पाणी करावं लागणार आहेच'
एवढं बोलून तो थांबला नाही. पुढे अजून  'योग्य  वयातच' रांधा-वाढा  संस्कार करणे   कसे गरजेचे आहे हे  अगदी ठासून सांगितले.  
'....' समोरचा माणूस हतबुद्ध झाला असावा.  त्याने पुन्हा एकदा बिर्याणीचे आणि त्या मुलीचे कौतुक केले आणि स्वतःचा डबा घेऊन निघून गेला.
  
*****************

गेल्या भारत वारीत आम्हाला काही कामासाठी बाहेर जायचं होतं. मुलांना घरीच  थांबायचं होतं.  बहिणीकडे  तिच्या मुलीला सांभाळायला बाई येते.  तिला मुलांना सोबत म्हणून आणखी थोडा वेळ थांबायला जमेल की नाही  माहिती नव्हतं. तिला विचारलं तर म्हणे फोन करते घरी.  हिला  सगळे भाभी म्हणतात. भाभीकडे मोबाइल आहे. मुलीचा नंबर हिंदीतून पाठ आहे  पण  वाचता  येत नाही  त्यामुळे  फोन करायचा तर  मदत लागते. मी तिला फोन लावून दिला.  माझ्या कामाची गोष्ट होती त्यामुळे कान देऊन ऐकलेला हा संवाद-
'हॅलो  बेटा, मम्मी बात कर रही  हुँ'
'...'
'बेटा,   पापा आ गये घर ?'
'...'
'अच्छा सुनो बेटा स्वाती  मैडम की बहन आयी  हैं और उन्हे शॉपिंग  करने  जाना है |  मैं थोडी देर   यहां रुक  रही  हुँ बच्चों  को देखने के लिए  क्योंकि  बच्चे नही जाना चाहते  हैं |'
'...'
' नहीं उसकी  कोई जरुरत  नहीं है बेटा, पापा आते  हि होंगे | वो खाना बना देंगे, आप  पढाई पे ध्यान दो बेटा |'
त्या दोघी अजून एखादा मिनिट बोलल्या आणि भाभीने फोन ठेऊन दिला. आमच्याकडे वळून म्हणाली,'मेरी बेटी सी ए कर रही है ना  मैडम, बहुत पढाई करनी  पडती है | अभी तो पढाई के दिन  हैं तो खाना-वाना  बनाने मे टैम  क्यों बरबाद  करें, हैं ना ?'

सगळेच सुशिक्षित असे असतात किंवा सगळेच अशिक्षित असे असतात असा अजिबात दावा करायचा नाही.  गंमत अशी आहे की  दोन्ही प्रकारच्या लोकांचे प्रमाण सारखेच असावे अशी शंका यावी इतपत असे विचार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कानावर आले आहेत !!!

Friday, March 30, 2012

सहावी !

...जीवन मग सहाव्या बहिणीच्या भेटीस आले. उंच उंच भिंती आणि काटेरी कुंपण असलेल्या तिच्या महालात आत जाण्यास वारा धजवेना. जीवन एकटेच आत गेले. कर्मठ भाव विहीन चेहर्‍याची सहावी त्याला सामोरी आली. आत महालात तिच्याच असंख्य प्रतिकृती मेंढरांसारख्या दावणीला बांधल्या होत्या. रिती, परंपरा, धर्म अशी अनेक जोखडे त्यांना घातली होती. त्या जोखडांनी त्या दुर्बल झाल्या होत्या. परंतु त्याचे त्यांना दु:ख नव्हते. त्या आनंदाने तिथे नांदत होत्या. कुणाचे जोखड सैल झाले आहे असे दिसताच दुसरी तत्परतेने ते अधिक करकचून बांधत होती. जीवनाने सहावीला म्हणावे, "मी तुमच्यासाठी भेट आणली आहे."

सहावीच्या प्रतिकृतींनी उत्सुकतेने त्या पेटार्‍याकडे पाहिले. काही आशेने जीवनाकडे धावल्या. परंतु बाकीच्यांनी त्यांचे पाय खेचले, ओरबाडले, बोचकारले. त्या जखमी झाल्या, रक्तबंबाळ झाल्या. काहींनी तेथेच हार मानली, काहींनी मान टाकली तर काही नेटाने जीवनाकडे चालत राहिल्या. त्यांच्या वाटेत होते असंख्य बोचरे काटे पण त्यांनी जिद्द सोडली नाही. कारण जीवनाने त्यांसाठी आणले होते एक मोकळे आकाश आणि विस्तीर्ण क्षितिज...उर भरून श्वास आणि स्वातंत्र्य!!!

Friday, March 23, 2012

गुढी पाडव्या निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

गुढी पाडव्या निमित्त हार्दिक शुभेच्छा !!! ब्लॉग आज दोन वर्षांचा झाला. नवीन वर्षात तिसरं आणि विसरं असं ब्लॉग बाळ्याच्या बाबतीत होऊ नये अशी आशा :)

Friday, March 16, 2012

सँटा फे, इ.

माझी एक मैत्रीण आहे. एकदा ती सुट्टी घेऊन एका ठिकाणी गेली.  जिथे गेली  ते गाव पॉप्युलर पटेल पॉइंट्स पैकी खासच नव्हतं. सहसा ती किंवा मी सुट्टी घेऊन कुठे  गेलो की सुट्टीचे  दिवस, आधीची, नंतरची आवराआवरी झाल्यावरच निवांत बोलणं होतं. ह्या वेळी मात्र तिचा  तिथे पोचल्यावर दुसर्‍या-तिसर्‍या दिवशीच फोन आला. अगदी भरभरुन बोलत होती. एकूण ते ठिकाण मैत्रिणीला भयंकर   आवडले  होते.  गूगल केल्यावर  तिथे ऑगस्टात एक (रेडवाले) इंडियन मार्केट पण असते  असे समजले. ठरलं! यंदा तिथेच उन्हाळ्याची सांगता करायची. उन्हाळा काही तिथे जाण्यासाठी 'आयडियल' ऋतू नाही. पण इंडियन मार्केट गाठायचं तर  उन्हाळ्यातच जायला हवं.  मग शोधाशोध करुन ऑगस्टातल्या त्या बाजाराच्या  तारखांना धरुन विमान, हॉटेल, गाडी इ तजवीज केली आणि आम्ही त्या गावी धडकलो.  तर त्या  गावाची आणि  आसपासच्या ठिकाणांची ही छोटी(?)शी ओळखः-  

न्यू मेक्सिको हे अमेरिकेतले  साऊथ वेस्टकडील एक राज्य. अलास्का आणि ओक्लाहोमाच्या खालोखाल इथे नेटिव्ह अमेरिकन्सची लोकसंख्या आहे. न्यू मेक्सिकोच्या ध्वजावर सुद्धा नेटिव्ह अमेरिकन्स ज्याला सूर्य संबोधतात त्या झिया (Zia) चे चिन्ह आहे.  मेक्सिको पासून अगदी जवळ असल्याने इथे स्पॅनिश लोक सुद्धा भरपूर संख्येने आहेत.  ह्या भागाला न्यू मेक्सिको  हे नाव मेक्सिकोहून  आलेल्या एका भटक्याने पहिल्यांदा दिले आणि पुढे हेच नाव रुढ झाले. सँटा फे  ही  नगरी ह्या न्यू मेक्सिकोची राजधानी.  ह्या नगरीचे  पूर्ण नाव आहे La Villa Real de la Santa Fé de San Francisco de Asís" ("The Royal Town of the Holy Faith of St. Francis of Assisi").

आम्ही न्यू यॉर्कहून (JFK) अल्बुकर्की (Albuquerque) ला गेलो. इंडियन मार्केट आणि आजूबाजूची ठिकाणं बघायला सोयीचे पडेल म्हणून हॉटेल सँटा फे गावापासून जवळ बुक केले होते. अल्बुकर्की ते सँटा फे अंतर साठेक मैल आहे. रस्त्याने 'लास वेगस' कडे जाणारे फाटे लागतात. पण मोहात न पडता आपण न्यू मेक्सिको बघायला आलोत हे लक्षात ठेवून गाडी पुढे हाकावी. सँटा फे गावातच अगदी मध्यवर्ती ठिकाणी ला फोंडा नावाचे पारंपारिक पद्धतीचे बांधकाम केलेले सुंदर हॉटेल आहे. हॉटेल बघितल्यावर तिथे बुकिंग  केलं नाही ह्याची फार हळहळ वाटली.

१. रिओ ग्रान्दे गॉर्ज (Rio Grande Gorge)
सँटा फे पासून साधारण सत्तर मैलांवर हे ठिकाण आहे. हा सगळा रस्ता फार सुरेख आहे. लालसर रंगाचे डोंगर, खुरटी झुडपे, मोजून मापून तासल्यासारखे लाल दगड-धोंडे सगळ्या रस्त्याने दिसत राहतात. अर्धा रस्ताभर एका बाजूस उंच डोंगर आणि दुसर्‍या बाजूस खळाळत वाहणारी रिओ ग्रान्दे नदी सोबत करतात. मध्येच ताओस गाव लागते. ताओसच्या अलीकडेच दूरवर जमिनीला मोठी भेग दिसायला लागते तीच रिओ ग्रान्दे गॉर्ज. गॉर्जवर बांधलेला पूल हे मुख्य आकर्षण (पटेल पॉइंट). हा पूल नदीपासून ६५० फूट उंचीवर बांधला आहे. पुलाच्या एका बाजूला दागिने, बसकरं, मडकी अशा सामान-सुमानाचा एक छोटा बाजार भरला होता.  


२.  पेब्ले डे ताओस (Pueblo de Taos)
सँटा फे कडून रिओ ग्रान्दे गॉर्जकडे जाताना ताओस सोडल्यावर जरा उजव्या बाजूस (चि र(स्ते) कां जीपीस ताईंच्या भाषेत 'slight right') एक फाटा पेब्ले डे ताओसकडे जातो. तो रस्ता घेतल्यावर मैलभरातच आपण एका वर्ल्ड हेरिटेजमध्ये प्रवेश करतो. तेराव्या शतकात जन्मास आलेल्या Pueblo Indian लोकांची ही वस्ती अजून विजेसारख्या आधुनिक सुविधांशिवाय रहाते. इथली लाल मातीची घरं, वस्तीच्या मध्यातून वाहणारा स्वच्छ पाण्याचा ओहोळ आणि घरांच्या बाहेर ठेवलेली जुन्या पद्धतीची वाद्यं आणि इतर साधन-सामुग्री बघायला एकदम छान वाटलं. वस्तीच्या पार्श्वभूमीस असलेले डोंगर चित्र पूर्ण करतात. ह्यातली काही घरं आत जाऊन बघता येतात. इथे घरांच्या बाहेर अंगणात लोकांनी स्वहस्ते बनवलेले दागिने विक्रीस ठेवले होते. 
तिथली दोन-तीन मजली मातीची घरं:


चर्चः

चमाड्याचे एक वाद्यः

ओहोळ:
सगळ्या वस्तीचा पिण्याच्या पाण्याचा हा स्त्रोत. त्यावर एका ठिकाणी वस्तीच्या दुसर्‍या भागात जाण्यासाठी लाकडी फळ्या घालून पूल बनवला आहे. तिथून जाताना पुलाच्या मध्यभागातून जायचे असे सांगण्यात आले. म्हणजे चपलेला लागलेली धूळ-माती पाण्यात पडत नाही.

 
** ताओस गावात बरीच रेस्टॉरंट आहेत. गॉर्मे शॉप्स, लोकल चॉकोलेट शॉप्स आहेत. गावात भटकंतीसाठी एखादा तास राखून ठेवायला हरकत नाही.

३. इंडियन मार्केट
हा  वार्षिक सोहळा बघायचा म्हणून आम्ही भर ऑगस्टात- भर उन्हाळ्यात सॅंटा फे गाठलं होतं. सँटा फे गावातच हा बाजार भरतो. पाचशेहून अधिक वेगवेगळ्या जमातीच्या लोकांनी आपली कलाकुसर सादर करायला इथे हजेरी लावली होती. दरवर्षी लावतात. शेकडो छोटी-छोटी दुकानं लागली होती. हस्तकलेचे विविध नमुने- टर्क्वाइज-जेड-कोरल-मदर ऑफ पर्लचे दागिने, मातीत घडवलेली स्वयंपाकाची उपकरणी, मेक्सिकन घरांच्या आणि लोकांच्या मातीच्या प्रतिकृती, बसकरं, सतरंज्या, पखाली, रेड इंडियनांचे पारंपारिक पोशाख तिथे बघायला मिळाले. आणखी बरेच दगड-धोंडे प्रकार होते जे आम्हाला समजले नाहीत. सर्वच वस्तू सुंदर होत्या ह्यात वाद नाही पण तिथली बसकरं आणि त्यांच्या किमती बघता भारतात जायचं तिकिट काढून आपल्या देशातल्या विणकरांनी विणलेली बसकरं आणणं परवडलं असतं. ह्यात अतिशोयक्ती अजिबात नाही. तात्पुरत्या उभारलेल्या स्टॉल्समधून विकल्या गेलेल्या वस्तूंची मिलियन डॉलर उलाढाल तिथे दर वर्षी होते. एका स्टॉलवर एक आजीबाई तिची नेहमीची  स्टॉलवाली दिसली नाही म्हणून चौकशी करताना दिसल्या.    

स्वयंपाकाची उपकरणी:



मातीच्या बाहुल्या इ विकायला ठेवून गिर्‍हाइकांच्या प्रतीक्षेत एक काकू :


मातीच्या घराची प्रतिकृती:


पखाली (?):


स्त्रियांचा पारंपारिक पोशाख:


हे असे खूप बहुरुपी तिथे होते:

एका ठिकाणी खूप गर्दी  जमली होती. कोपर्‍यात गर्दीच्या वर डोकावणारी पिसं, भाले दिसले म्हणून गेलो तर रेड इंडियन  वेषभूषा स्पर्धा सुरु  होती. सगळ्या अमेरिकेतून लोक सोंग घेऊन आले होते. प्रेक्षकांमध्ये न्यू यॉर्कहून आलेला एक जण  भेटला.  त्याला भेटून आपणच अडीच वेडे इतक्या दूरून आलो नाहीत ह्याचं जरा बरं वाटलं.  सगळा बाजार भटकून झाल्यावर तिथल्या सुव्हेनुर शॉपमधून लाल मिरच्यांचे छाप असलेले  टंपाळ घेतले आणि हॉटेलचा रस्ता धरला.

वेषभूषा स्पर्धेतले स्पर्धकः

** ह्या बाजारात खूप कमी दुकानांत क्रेडिट कार्ड घेतात त्यामुळे कॅश सोबत ठेवा.
*** इथल्या वस्तू, दागिने ह्यांच्या किमती इतक्या आवाच्या सव्वा आहेत की फारशी कॅश बाळगली नाही तरी चालेल.

४. सेंट फ्रान्सिस कॅथेड्रल
गावातच एका बाजूस हे कॅथेड्रल आहे.  फ्रेंच पद्धतीचे बांधकाम केलेली ही  संपूर्ण इमारत लाईम स्टोनपासून  बनवली आहे.  स्टेन ग्लासचा  अगदी सढळ वापर केलेला दिसतो.  चर्चची आतली बाजू  स्टेन  ग्लास आणि  सोनेरी रंगामुळे खूप सुंदर दिसते.  इथे फार वेळ  थांबता आले नाही कारण...    
अशा प्रकारचे प्रार्थनास्थळ बघण्याची लेकाची पहिलीच वेळ होती. आत गेल्या गेल्या चौफेर नजर फिरवून स्पष्ट खणखणीत आवाजात प्रश्न, 'What is that guy doing up there ?'  आतल्या शांततेत  त्याचा आवाज जरा जास्तच लाउड आणि क्लिअर. तिथेच बसलेल्या एका आजीबाईंनी असं काही बघितलं  आमच्याकडे. त्यांना शक्य असतं तर त्यांनी नुसत्या नजरेने आम्हाला वर छताला उलटं टांगलं असतं.  त्याला  बखोटीला  धरुन शक्य  तितक्या वेगाने  चर्चमधून काढता पाय  घेतला. तेव्हापासून जिथे कुठे जाणार असू त्या ठिकाणाबद्दल लेकाला दोन शब्द आधीच सांगण्याची सवय लावून घेतली आहे.   
 

 ५. सँटा फे डाउन टाउन
काय लिहिणार ! अतिशय सुंदर सुबक गाव आहे. गावात दोन्ही तिन्ही वेळा गेलो तेव्हा तिथल्या रस्त्यांवरुन रमत गमत चक्कर   मारत, मध्येच एखाद्या दुकानात शिरुन  थोडी खरेदी, एखाद्या चौकात कुणी अवलिया आपली कला सादर करत असेल त्याची मौज  घेत वेळ कसा गेला खरोखर कळलंच नाही. अँटिक्स आणि लेदरच्या वस्तू  अपार मिळतात. इथे घासाघीस पण होते..होत असावी. एका हँड बॅगची किंमत ऐकून मी पाठ वळवल्यावर   दुकानातल्या  काकू  'तुला  केवढ्याला हवी ?' असं म्हणाल्या तेव्हा लक्षात आले.  त्यानंतर मात्र मी  घासाघीस  कौशल्य पणास लावून बॅग हस्तगत केली. सँटा फे गावात आणि आजूबाजूस असंख्य आर्ट गॅलरिज/स्टुडिओज आहेत. झुरिकला गेलो होतो तेव्हा दिवसाच्या कुठल्याही प्रहरी कॅफेच्या बाहेर बसून कॉफी ढोसत सिगरेटी फुंकणारी तिथली जनता बघितली तेव्हा हेच त्यांचं जगणं असं  वाटलेलं. तसं इथे लोकं कलेशिवाय दुसरं काही जगतच नाहीत असं वाटत राहतं. गावात सगळ्या रस्त्यांवर कुठे कुठे आर्ट पीसेस ठेवले/लावले आहेत.



मेक्सिकन  फूड आवडत असेल तर  खाण्या-पिण्याची इथे भरपूर चंगळ आहे. तशी ती सगळीकडेच असते पण इथे शाकाहारींना सुद्धा  फक्त  सॅलड किंवा फ्राइज वगैरे खाण्यावर समाधान मानावं लागत नाही.  गावात भटकत असताना  एक आजीबाई स्वतःहूनच फोटो काढून देते म्हणाल्या.  दोन दिवस तिथे राहून सुद्धा आम्ही कॅफे पास्काल  मध्ये जेवलो नाही ह्याचं त्यांना भारीच आश्चर्य वाटलेलं दिसलं. आम्हाला ह्या कॅफेचं नाव सुद्धा माहिती नव्हतं.  आजीबाईंना  टाटा केल्यावर  अर्थातच आम्ही आधी ह्या कॅफेचा रस्ता धरला. तिथे पोचल्यावर आता आश्चर्याची पाळी आमच्यावर आली.   दुपारी एक वाजता 'ब्रंच'ची वेटिंग लाइन ४५ मिनिटांची होती. तिथे नंबर लावला. पण फारच अपेक्षाभंग झाला.  मेनु अगदी मोजका होता , जेवण पण काही खास नव्हते.    

कॅफेच्या  समोरच्या चौकात  ओबड-धोबड दगडांचा वापर करुन बनवलेलं  कारंजं  आहे.  कारंज्याच्या भोवती  दगडांची बाकडी आहेत.           

चौक ओलांडून गेलं की समोरच द चिली  नावाचं गॉर्मे शॉप आहे.  तिथे आपल्या गिट्सच्या इंस्टंट इडली बिडली पिठांसारखे इंस्टंट साल्सा पाकिटं मिळाली.  तयार साल्साचे पण छपन्न प्रकार होते.  तिथ आम्ही ग्रीन आणि रेड चिली सॉस घेतले, अप्रतिम  होते.

६. बान्देरा ज्वालामुखी
पहिले दोन दिवस सँटा फे गाव आणि आजूबाजूची ठिकाणं बघण्यात घालवल्यावर आम्ही जरा अल्बुकर्कीकडे सरकलो. आजवर कधी ज्वालामुखी बघितलेला नसल्याने बान्देरा बघायचाच होता. अल्बुकर्कीपासून पश्चिम दिशेस १०० मैलांवर हे ठिकाण आहे. मुख्य रस्ता सोडल्यावर २५ मैलांची स्टेट पार्कमधून जाणारी चढण आहे. वळणा-वळणांचा, जंगलातून जाणारा हा रस्ता जितका सुरेख तितका निर्जन आहे. वस्ती नाही, इतर वाहनं नाहीत, टुरिस्ट इन्फॉरमेशन सेंटर्स नाहीत, गॅस स्टेशन नाहीत, हरणा-बिरणांचे फक्त बोर्ड दिसतात. इथल्या सगळ्याच ठिकाणांचं ते वैशिष्ट्य म्हणता येईल. आपण नक्की चुकलो आणि आता परतीचा रस्ता धरावा की थोडं आणखी पुढे जावं असं वाटल्या शिवाय आपण इप्सित स्थळी पोचतच नाही. जीव यथायोग्य टांगणीला लागल्यावर एकदाचा ज्वालामुखीकडे जाणारा 'बाण' दिसला.

गाडी पार्क करुन टुरिस्ट सेंटरमध्ये गेलो. हे ठिकाण Candelaria कुटुंबाच्या अधिपत्यात आहे. इथली सर्व व्यवस्था तेच बघतात. हे त्यांच्या मालकीचं आहे की काय माहिती नाही. समोरचा डोंगर चढून गेल्यावर ज्वालामुखी दिसेल अशी माहिती तिथे मिळाली. अस्वल दिसल्यास मोठ्याने आरडा-ओरडा करा म्हणे (आवाज तर फुटला पाहिजे!). पलीकडच्या डोंगरावर ही अस्वले राहतात आणि अधून मधून रस्ता चुकतात. आलीया भोगाशी.. म्हणत निघालो. रस्त्यात एक जाडजूड काठी उचलून घेतली उगीच. ज्वालामुखी दहा हजार वर्षांपूर्वी उसळला होता. हे फील्ड ऑफ लाव्हा आहे असे वाचले होते पण म्हणून सगळीकडे कोळसाच कोळसा असेल असे अजिबात वाटले नव्हते. साधे 'समर फ्लिप-फ्लॉप्स' घालून अजिबात चालता येत नव्हते. तिथे चांगली ग्रिप असलेले ट्रेकिंग शूज घालूनच जायला हवे. बरं त्या कोळशावर चालताना होणार्‍या आवाजाने अस्वलास आम्ही इकडे आहोत हे कळेल ही पण भिती होतीच. ही चढण चढताना खूप झाडांची अर्धवट जळकी खोडं दिसतात. कोळशातून उगवलेली, फुललेली रोपटी दिसतात. निसर्गाचीच दोन रुपं एकमेकांवर कुरघोडी करतात जणू.

डोंगर चढल्यावर आठशे फूट खोल आणि अर्धा मैलभर परिघ असलेला हा कोन समोरा येतो. आता निद्रिस्त असला तरी तो कोन बघितल्यावर पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही. भरीस भर व्होल्कॅनो चित्रपटातली दृष्य आठवतात.  लेकाला खांद्यावर घेऊन कितपत बुंगाट पळता येईल असाही एक विचार मनास शिवून गेला. कोनाच्या एका बाजूस जमिनीला भली मोठी भेग पडलीये. पानांची सळसळ, आमचा पायरव, झाडांची जळकी-कुजकी खोडं, ती भेग सगळं एकदम गूढ वातावरण वाटत होतं. जरा वेळ थांबून फोटो काढून तिथे पडलेले पाच सहा दगडधोंडे घेतले आणि परतीची वाट धरली. वाटेत आणखी चार-दोन (मानवी) जोडपी दिसल्यावर फारच हुश्श वाटले. अस्वल काही कुठे दिसले नाही.     


७. बर्फाची गुहा
टुरिस्ट सेंटरच्या एका बाजूने ज्वालामुखीकडे जाता येतं तर दुसर्‍या बाजूसच ही बर्फाची गुहा आहे. हे ठिकाण The Land of Fire and Ice म्हणून ओळखलं जातं. हजारो वर्षांपूर्वी नेटिव्ह पेब्लो (Pueblo) जमातीच्या लोकांनी शोधलेली वाटच आजही गुहेकडे घेऊन जाते. ही ट्रेल फार सुंदर, शांत आहे. गुहा लाव्हारसापासून बनली आहे. आतले गुहेतले टेंपरेचर ३१ फॅ पेक्षा जास्त कधीच होत नाही. आत साठलेल्या बर्फावर सुर्यपकिरणं पडून सुंदर हिरवा रंग परावर्तित झाला  होता. सध्या  तिथे २० फूट जाडीचा बर्फाचा थर तयार  झाला आहे.  गुहेबाहेर हिवाळ्यात  पडलेल्या बर्फाचे (स्नो) वितळलेले पाणी आणि पावसाच्या पाण्याची त्यात दर  वर्षी भर पडते.
 

** टुरिस्ट सेंटरमध्ये शुद्ध तांब्यातले खूप सुंदर दागिने मिळतात. मी  घेतलेले ब्रेसलेट इ. अजिबात काळे पडलेले नाहीत.

८. सँडिआ पीक ट्राम वे
हा ट्राम वे ह्या ट्रिपमधला एक अविस्मरणीय अनुभव. सँटा फे आणि अल्बुकर्कीच्या मध्ये हे ठिकाण आहे. अल्बुकर्कीच्या थोडं अलीकडे एक्झिट घेतलं की सँडिआ डोंगरास सामोरा ठेवून ५-६ मैलांचा रस्ता आहे. इथे पण चुकलो रे गड्या म्हणेपर्यंत ट्राम वे ची काहीही चाहूल लागत नाही. मध्येच कसिनोकडे जाणारा फाटा लागतो. कसिनो कनेटिकटात पण आहेत तेव्हा फाट्याला फाट्यावर मारुन पुढे गेलो.

२.७ मैलांचा हा ट्राम वे अमेरिकेतला सगळ्यात जास्त लांबीचा आणि सगळ्यात जास्त उंचीवर जाणारा  रोप वे  आहे. ७,००० फुटांवर एक टॉवर आणि साधारण ८,७०० फुटांवर दुसरा, अशा दोन टॉवर्सनी हा रस्ता (?) तोलून धरला आहे. पहिला टॉवर पार करताना चांगलाच हिंदोळा बसतो. ते टॉवर्स कसे बांधले इ माहिती जाताना देतात. पण सगळे लक्ष बाहेर, खाली बघण्यात असल्याने नंतर लेख लिहायची वेळ आलीच तर विकिदेवांना शरण जावे.
 
दिवसभरात चार की पाच फ्लाइट्स (?) जा-ये करतात. पैकी सूर्यास्ताची वेळ वर (वर म्हणजे डोंगरावर) जाण्यासाठी उत्तम. खाली दाट किबोआचे अरण्य आणि समोर पसरलेली रिओ ग्रान्दे व्हॅली. झरझर अस्तास जाणारे सूर्यदेव आणि त्याच गतीने रंग बदलणारे आकाश. दूर गावांमध्ये चमकू लागलेले दिवे. फार मनोहारी देखावा आहे हा सगळाच.

ट्रेकर्ससाठी/हायकर्ससाठी सँडिआ पीक हे आकर्षणाचे केंद्र आहे. पायी डोंगर चढून मग खाली उतरताना ट्राम घ्यायची ट्रेकर्सची रीत असावी असं आमच्या ट्राममधल्या दोघांच्या बोलण्यावरुन वाटलं. खाली अस्वलं पण दिसतील असं सांगण्यात आलं होतं. मान मोडेपर्यंत वाकून बघितलं तरी एक सुद्धा अस्वल दिसलं नाही. एकंदरीत न्यु मेक्सिकोतल्या अस्वलांनी आमची फारच निराशा  केली.

वर डोंगर माथ्यावर एक आणि पायथ्याशी एक अशी दोन रेस्टॉरंटस् आहेत. बाहेर डेकवर बसून  सूर्यास्त बघायला खूप छान वाटत असणार. दुर्दैवाने आम्ही गेलो त्या दुपारी पाऊस पडून गेल्याने प्र-च-ड थंडी होती. त्यामुळे बाहेर बसून जेवता आले नाही. 


९. इकडचं-तिकडचं
ह्या भागात असलेली प्रेक्षणीय स्थळे बर्‍यापैकी दूर-दूर असल्याने आणि पब्लिक ट्रान्सपोर्टची बोंब असल्याने हे सगळं बघण्यासाठी गाडी भाड्याने घेणे हाच एक पर्याय आहे. अल्बुकर्की आणि सँटा फे असे दोन इंटरनॅशनल एअर पोर्ट्स आहेत. वर उल्लेखल्या प्रमाणे अल्बुकर्की ते सँटा फे अंतर साधारण एक तासाचं आहे. ही सगळी ठिकाणं एकमेकांपासून मोअर ऑर लेस एक तासाच्याच अंतरावर आहेत. व्हाइट सँड ड्युन्स अल्बुकर्कीच्या दक्षिणेस (बहुतेक) थोडे दूर आहेत. तिथे आम्ही वेळे अभावी गेलो नाही. हवामानाचा विचार करता  वसंत  ऋतू किंवा उन्हाळ्याचे सुरुवातीचे दिवस इथे  फिरण्यासाठी  'आयडियल' म्हणता येतील. पण इंडियन मार्केट बघता येणार नाही.

आम्हाला ट्राय स्टेटच्या रहदारीची सवय असल्याने रस्ते बर्‍यापैकी ओसाड वाटले. इंटरस्टेट हायवेवर स्पीड लिमिट(?) बर्‍याच ठिकाणी ८५ पर्यंत आहे. पण हाय वे वरचे रेस्ट एरिया, गॅस स्टेशन्स आणि गावं खूप जास्त अंतरांवर आहेत. 'पॉटी ट्रेनिंग इन प्रोग्रेस' असलेली बाळं सोबत असतील तर जरा पंचाईत होते. गाडीचं खानपान सुद्धा वेळच्या वेळी केलेलं बरं.


लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी