दिवाळी उलटून
गेल्यावर आता या पणत्या इथे डकवायचे काही खास प्रयोजन नाही. पुढच्या
दिवाळीस आठवण राहीलच असे नाही म्हणून आज..
माझ्या सारखे कुणी लेमन आणि ले-मन्या रंगारी असतील तर त्यांना थोडासा दिलासा, आधार, धीर, हुरूप देण्यासाठी काही सूचना:
१. अजिबात घाबरायचं नाही.
२. धीर सुटू द्यायचा नाही.
३. म्हाराज गडावर पोचल्याचा बार झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही.
यातला गमतीचा भाग वगळल्यास, स्वहस्ते पणत्या रंगवायची इच्छा असल्यास इंडियन ग्रोसरीतून पणत्या आणाव्यात. मायकल्स किंवा हॉबी लॉबी सारख्या दुकानातून आउटडोअर किंवा ऑइल किंवा ग्लास पेंट, बारीक टोकं असलेले ब्रश नक्षी काढण्यासाठी आणि १-२ जरा मोठे ब्रश बॅकग्राउंड रंगवण्यासाठी आणावेत. मी असं एक पॅक लेकासाठी आणलं होतं. त्याच्याकडे उधारी केली. रंगवायला घ्यायच्या आधी कुठलेही संस्करण (पाण्यात घालून ठेवणे इ.) पणत्यांवर केले नाही तरी चालते. बारीक नक्षी चितारताना हात हालणे किंवा कापणे होत असल्यास दुसर्या प्रकाशचित्रात आहेत तशा कोरलेल्या नक्षीच्या पणत्या आणाव्यात. रंग व ब्रश वेगळे आणण्यापेक्षा ऑइल पेंटची पेनं मिळतात ती आणावीत. तयार पणत्यांवर वरून वॉर्निश इ. लावले नाही तरी चालते. या पणत्यांमध्ये शक्यतो तेल आणि वात घालू नये, टी लाइट्स लावावेत.
ही सगळी उठाठेव कशासाठी? तर स्वतः सजवलेल्या पणत्यांमध्ये दिवे लावले की संध्याकाळ जरा जास्तच प्रकाशमान होते.

0 टिप्पणी(ण्या):
Post a Comment