Thursday, April 8, 2010

लेखणीवाल्या प्राण्यांची सभा

लेखणीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा
पोपट होता सभापती मधोमध उभा

पोपट म्हणाला, मित्रांनो देवाघरची देणगी
देवाघरची देणगी, अशी ही लेखणी
ह्या लेखणीचे कराल काय ?

गाय म्हणाली अशा अशा
पाडेन मी कविता खाशा

घोडा म्हणाला, कथा ढापेन कविता पाडेन
मी सगळ्या ब्लॉगविश्वात हैदोस घालेन,
हैदोस घालेन

कुत्रा म्हणाला, कुत्रा म्हणाला
खूशीत येइन तेव्हा,
प्रतिक्रीया देइन मोठ्या

मांजरी म्हणाली, नाही गं बाई
कुत्र्यासारखे माझी मुळीच नाही
खूप खूश होइन जेव्हा प्रतिक्रीया येइल,
प्रतिक्रीया येइल

खार म्हणाली, खार म्हणाली
पडेल कविता, पडेल कविता
तेव्हाच होतील प्रतिसादांच्या बाता

मासा म्हणाला, लेखणीचा उपयोग
काय सांगु आता पण..पाडत राहिन कविता

मोर म्हणाला, लाडं लाडं कविता पाडेन मी पाडेन
कवितेत माझ्या अगम्य शब्द टाकेन मी टाकेन

कांगारु म्हणाले, माझे काय ?
तुझे काय ? तुझी लेखणी म्हणजे
खाली डोकं वर पाय !!!

ह्या लेखणीचा कर्फरा (करा फरा फरा) उपयोग
नाहीतर काय होइल, काय होइल, काय होइल....
दोन पायांच्या माणसाची ज्ञानेश्वरी
लोकांच्या मनावर राज्य करत राहिल !!!

** मूळ गाणे: शेपटीवाल्या प्राण्यांची

7 टिप्पणी(ण्या):

अपर्णा said...

ha ha ha....mala khara mhaaje original kavita pan hawi hoti majhya mulasathi pan aata hyachyawarun kahi na kahi banawata yeil....jyana fakt gadyaamadhe interest asel tyanchyasathi ek ajun version kadhun taka aata....

Devidas Deshpande said...

छान आहे. खरं आहे.

Pritesh Taral said...

हाहा हा हा .... मी तर लेखनीचा उपयोगाच करत नाही , मी तर laptop वापरतो ..

कविता एकदम भारी वाटली , कविता वाचून १०-१५ वर्षापुर्वीच बालपन आठवल

Unknown said...

कविता छान आहे मूळ कवितेइतकीच.

विशाखा said...

Chhan ahe! Saglya praanyanni kavita ch ka bare lihaychya?

तृप्ती said...

धन्यवाद मंडळी :)

Bhagyashree said...

mastay g !! :D :D

Post a Comment

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी