नोकरी मिळाली की दर महिन्याला एक तरी पुस्तक घ्यायचं असं इतर अनेक पुस्तकप्रेमींप्रमाणे मी पण ठरवलं होतं. स्वकमाईतला काही हिस्सा नियमित पुस्तक खरेदीवर खर्च करावा अशी एक इच्छा होती. त्या काळात माहितीचे महाजाल नसल्यानं श्रीरामपूर सारख्या लहान गावात नव्या-जुन्या पुस्तकांबद्दल माहिती मिळण्याचा वृत्तपत्रांच्या रविवारी निघणार्या पुरवण्यांमध्ये येणारं पुस्तक परीक्षण हा एकच मार्ग होता. आमच्याकडे येणारी आणि शेजारून आणलेला महाराष्ट्र टाइम्स अशी तिन्ही-चारी वृत्तपत्रं मिळून मी एक पुस्तकांची 'विश लिस्ट' एका डायरीत बनवली होती. शिक्षण संपल्यावर माझ्यासोबत ती डायरी पण बंबई सें पुना, पुना सें दिल्ली, दिल्ली सें (लिटरली) पटना भटकली. बूड एका गावी स्थिरावलं तसं डायरी एका 'डोळ्यातून हमखास पाणी काढणारी पत्रं, वार्षिक स्नेहसंमेलनांतले तोंडाला फक्की फासलेले फोटो, धाव्वीत शाळेकडून मिळालेलं बक्षीस' इ. सामानसुमानात गाडली गेली. या वर्षी एक दिवस 'सीरियस क्लीनिंग'चा झटका आला तेव्हा पुन्हा हाती लागली. गेल्या अनेक वर्षांत अगदी महिन्याला एक नाही पण बर्यापैकी सातत्यानं पुस्तकं घेतली आहेत. तरी ही यादी चाळून बघितल्यावर लक्षात आलं की त्यातली बरीच पुस्तकं नंतर घेतली गेली नाहीत किंवा वाचली गेली नाहीत. डायरीत पुस्तकाचं नाव, लेखक, प्रकाशक अशी माहिती नोंदवलेली आहे. पण पुस्तक नक्की का वाचनीय आहे याची नोंद ठेवलेली नाही. यातली बरीचशी नावं बघितल्यावर त्या पुस्तकाची तेव्हा नोंद का ठेवली असेल अजिबात आठवत नाही. त्यामुळे आता न वाचलेली पुस्तकं घ्यावीत की नाही प्रश्नच आहे. तेव्हा वाचनीय वाटलेले विषय-आशय आता (आता आम्ही मोठ्ठे झालो ना) कितपत आवडतील अशी एक शंका पण आहे. असो, हाताशी असावी म्हणून आणि आज वेळ होता म्हणून बरीचशी छापून काढली.
मराठी:
जॅक्लीन केनेडी ओअॅसिस - सीताराम मेणजोगे - नवचैतन्य प्रकाशन
फुलवेल - इंदिरा संत - पॉप्युलर प्रकाशन
तेजोमय संगर हा - सोमनाथ समेळ - आदित्य प्रकाशन
स्पेस ट्रायअँगल - बाळ भागवत - श्रीराम बुक एजन्सी
बर्म्युडा ट्रायअँगल - चार्ल्स बर्लिझ - विजय देवधर - श्रीराम बुक एजन्सी
बिस्मार्कची शिकार - फ्रँक ब्रेनॉड - अनंत भावे - मेहता पब्लिशिंग हाउस
आदिम - रेखा बैजल - शब्द प्रकाशन
शेलका साज - शिवाजी सावंत - मेहता पब्लिशिंग हाउस
दिग्विजय - भा द खेर, राजेंद्र खेर - मेहता पब्लिशिंग हाउस
रक्तखुणा - प्रल्हाद वाडेर - स्नेहवर्धन प्रकाशन
बंदीश - अंजली सोमण - राजहंस प्रकाशन
शपथ - नारायण धारप - दिलीप प्रकाशन
माहितीचे महामार्ग - के डी पावटे - वैशाली जोशी - मेहता पब्लिशिंग हाउस
पेशीबद्ध जीवन : एक निरंतर प्रवास - डॉ. बाळ फोंडके - कविता भालेराव - मेहता पब्लिशिंग हाउस
सिकंदर - प्रमोद ओक - राजहंस प्रकाशन
ऑलिंपिक्सच्या उगमाशी - हेमंत जोगदेव - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
गस्तवाल्याची गस्त - ग ह पाटील - प्रतिभा प्रकाशन
वात्सल्यपथ - व्यास बाळ - मीरा शिराली
डॉक्टर नसेल तेथे - डेव्हिड बर्नर
राजा शिवछत्रपती - ब म पुरंदरे
प्रेषित - जयंत नारळीकर
यक्षांची देणगी - जयंत नारळीकर
अंतराळातील भस्मासुर - जयंत नारळीकर
थँक यु मिस्टर ग्लाड - अनिल बर्वे
मारुती कारस्थान - वि स वाळिंबे
एल्गार एल्गार - ग म केळकर
साहसांच्या जगात - विजय देवधर
स्वामी - रणजित देसाई
माझी जन्मठेप - वि दा सावरकर
सनी डेज - सुनील गावसकर
माझ्या आठवणी - वि दा सावरकर
ज्ञानवृक्षाच्या पारंब्या - सुरेश मथुरे
आनंदमठ - बंकिमचंद्र चटर्जी
राजा रवी वर्मा - रणजित देसाई
सुखाचा शोध - प्र के अत्रे
लव्हाळी - श्री ना पेंडसे
रक्तकमळे
शून्याची देणगी
छावा
शेलार खिंड
इंग्रजी:
Electroral Reforms of India - S S Gadakari - Wheeler Publications
Assert and Succeed - Rishi Kumar Pandya - Arnold Associates
Women's Health in India : Risk & Vulnerability - Monica Dasgupta, Linkedin Chain, T N Krishnan - Oxford Uni Press
The Advent of Advani - Atmaram Kulkarni - Aditya Prakashan
Genes and Means - D. Balasubramanian
Man In Space - P Radhakrishnan
Green Gene - Shakuntala Bhattacharya
Make It Cloud Nine - Bal Phondke
Cats Have Nine Lives - D. Balasubramanian
Managing for the Future - Peter Drucker
His Master's Slave - Tapas Bhattacharya
Green Willow - Enid BlyTon
The Art of Cricket - Don Bradman
Life - Elia Kazan
My 60 Memorable Games - Bobby Fischer
Thin Air - George Simpson, Neil Berger
Flame of Discovery - D A Richards
Actors on Acting
Honorable Insults
मराठी:
जॅक्लीन केनेडी ओअॅसिस - सीताराम मेणजोगे - नवचैतन्य प्रकाशन
फुलवेल - इंदिरा संत - पॉप्युलर प्रकाशन
तेजोमय संगर हा - सोमनाथ समेळ - आदित्य प्रकाशन
स्पेस ट्रायअँगल - बाळ भागवत - श्रीराम बुक एजन्सी
बर्म्युडा ट्रायअँगल - चार्ल्स बर्लिझ - विजय देवधर - श्रीराम बुक एजन्सी
बिस्मार्कची शिकार - फ्रँक ब्रेनॉड - अनंत भावे - मेहता पब्लिशिंग हाउस
आदिम - रेखा बैजल - शब्द प्रकाशन
शेलका साज - शिवाजी सावंत - मेहता पब्लिशिंग हाउस
दिग्विजय - भा द खेर, राजेंद्र खेर - मेहता पब्लिशिंग हाउस
रक्तखुणा - प्रल्हाद वाडेर - स्नेहवर्धन प्रकाशन
बंदीश - अंजली सोमण - राजहंस प्रकाशन
शपथ - नारायण धारप - दिलीप प्रकाशन
माहितीचे महामार्ग - के डी पावटे - वैशाली जोशी - मेहता पब्लिशिंग हाउस
पेशीबद्ध जीवन : एक निरंतर प्रवास - डॉ. बाळ फोंडके - कविता भालेराव - मेहता पब्लिशिंग हाउस
सिकंदर - प्रमोद ओक - राजहंस प्रकाशन
ऑलिंपिक्सच्या उगमाशी - हेमंत जोगदेव - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
गस्तवाल्याची गस्त - ग ह पाटील - प्रतिभा प्रकाशन
वात्सल्यपथ - व्यास बाळ - मीरा शिराली
डॉक्टर नसेल तेथे - डेव्हिड बर्नर
राजा शिवछत्रपती - ब म पुरंदरे
प्रेषित - जयंत नारळीकर
यक्षांची देणगी - जयंत नारळीकर
अंतराळातील भस्मासुर - जयंत नारळीकर
थँक यु मिस्टर ग्लाड - अनिल बर्वे
मारुती कारस्थान - वि स वाळिंबे
एल्गार एल्गार - ग म केळकर
साहसांच्या जगात - विजय देवधर
स्वामी - रणजित देसाई
माझी जन्मठेप - वि दा सावरकर
सनी डेज - सुनील गावसकर
माझ्या आठवणी - वि दा सावरकर
ज्ञानवृक्षाच्या पारंब्या - सुरेश मथुरे
आनंदमठ - बंकिमचंद्र चटर्जी
राजा रवी वर्मा - रणजित देसाई
सुखाचा शोध - प्र के अत्रे
लव्हाळी - श्री ना पेंडसे
रक्तकमळे
शून्याची देणगी
छावा
शेलार खिंड
इंग्रजी:
Electroral Reforms of India - S S Gadakari - Wheeler Publications
Assert and Succeed - Rishi Kumar Pandya - Arnold Associates
Women's Health in India : Risk & Vulnerability - Monica Dasgupta, Linkedin Chain, T N Krishnan - Oxford Uni Press
The Advent of Advani - Atmaram Kulkarni - Aditya Prakashan
Genes and Means - D. Balasubramanian
Man In Space - P Radhakrishnan
Green Gene - Shakuntala Bhattacharya
Make It Cloud Nine - Bal Phondke
Cats Have Nine Lives - D. Balasubramanian
Managing for the Future - Peter Drucker
His Master's Slave - Tapas Bhattacharya
Green Willow - Enid BlyTon
The Art of Cricket - Don Bradman
Life - Elia Kazan
My 60 Memorable Games - Bobby Fischer
Thin Air - George Simpson, Neil Berger
Flame of Discovery - D A Richards
Actors on Acting
Honorable Insults
9 टिप्पणी(ण्या):
राजा शिवछत्रपति नक्कीच संग्राह्य आहे. जरूर विकत घ्या.
स्पेस ट्रायंगल विंग्रजी आणि मराठी दोन्ही आहे? मला माहित नव्हतं.
जयंत नारळीकरांच्या विज्ञान कथा चांगल्या होत्या पण मला शंका आहे की मी त्या विकत घेऊन वाचल्या असत्या का. त्यापेक्षा "सृष्टी विज्ञान गाथे" चे दोन्ही खंड उत्तम आहेत. "आकाशाशी जडले नाते" पण त्यांचेच एक आणखी. आता इंटरनेटमुळे माहिती चा एका क्लिकवर उपलब्ध आहे पण मला अजूनही ती पुस्तके चाळाविशी वाटतात.
भा द खेरांचे "दिग्विजय" नीटसे आठवत नाही पण नेपोलिअन वर होते बहुदा.
बाकी मुंबई-पुणे-पटना ह्यात कुठेही दक्षिण भारताला स्पर्श केलेला दिसत नाहीये तरी "बाळ भागवत" चे स्पेलिंग Bala Bhagavath दिसतंय ! :D
तुमच्या विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)
राजा शिवछत्रपति वाचलं आहे.
स्पेस ट्रायंगल बहुतेक तरी फक्त मराठीत आहे. चुकून दोन्ही याद्यांमध्ये आलंय.
जयंत नारळीकरांच्या बर्याच विज्ञान कथा सुदैवाने शाळेतल्या लायब्ररीत होत्या, तेव्हाच वाचल्या. मला तरी खूप आवडल्या होत्या. पण "सृष्टी विज्ञान गाथा" माहिती नव्हतं. "आकाशाशी जडले नाते" पण माहिती नव्हतं.
मला अजूनही ती पुस्तके चाळाविशी वाटतात. >>> +१
भागवतांना भागवथ गूगलने केलं :)
ही यादी वचून गम्मत वाटली आणि आता नवीन वर्षाचा एक निर्धार म्हणजे मी गेल्या ५ वर्षात वाचलेल्या पुस्तकांची यादी तयार करणे.
शुभेच्छा!
रुपाली
Thanks for your comment Rupali :)
Masta cindy ! :)
baap re! khupach mothi list ahe!! pan nave nondavun thevlis hey uttamach.
मारुती कारस्थान पुस्तक मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले परन्तु अजूनही नवे अथवा जुने कोणत्याही स्थितीतले पुस्तक मिळू शकले नाही. तुमच्या पुस्तकाच्या यादीत हे नाव वाचले. या संदर्भात तुमची काही मदत होऊ शकेल का?
नमस्कार अॅन्डी, माझ्याकडे नाहीये पुस्तक. पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती पण नंतर ती उठवली की कसं मला माहिती नाही.
नमस्कार किरणोत्सर्ग, माफ करा पण माझ्याकडे नाहीये हे पुस्तक.
Post a Comment